पोस्ट्स

श्रीमद्भगवद्गीता - ॥१-७॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥ हे ब्राह्मणश्रेष्ठ, कृपया आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत आपल्या माहितीसाठी मी आपल्याला सैन्याच्या सेनापती बद्दल सांगतो. भावार्थः मागील श्लोक पुढील श्लोक

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-४, १-५, १-६॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि । युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥४॥ धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् । पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः ॥५॥ युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् । सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥६॥ अत्र - येथे महेष्वासाः - मोठीमोठी धनुष्ये धारण केलेले च - आणि युधि - युद्धात भीमार्जुनसमाः - भीम व अर्जुन याप्रमाणे असणारे शूराः - शूर-वीर युयुधानः - सात्यकी विराटः - विराट महारथः - महारथी द्रुपदः - द्रुपद धृष्टकेतुः - धृष्टकेतू चेकितानः- चेकितान वीर्यवान्‌ - बलवान काशिराजः - काशिराज पुरुजित्‌ - पुरुजित कुन्तिभोजः - कुन्तिभोज नरपुङ्गवः - नरश्रेष्ठ शैब्यः - शैब्य विक्रान्तः - पराक्रमी युधामन्युः - युधामन्यू वीर्यवान्‌ - शक्तिमान उत्तमौजाः - उत्तमौजा सौभद्रः - सुभद्रेचा पुत्र द्रौपदेयाः - द्रौपदीचे पाच पुत्र सर्व एव - हे सर्वच महारथाः - महारथी   या सैन्यात मोठीमोठी धनुष्ये घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद ॥४॥ धृष्टकेतू, चेकितान, बलवान काशिराज, पुरुजित, कुंति...

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-३॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः संजय उवाच । पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् । व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥३॥ आचार्य - अहो आचार्य तव - तुमच्या धीमता - बुद्धिमान शिष्येण - शिष्याने द्रुपदपुत्रेण - द्रुपदपुत्र धष्टद्युम्नाने व्युढाम्‌ - व्युहरचना करून सिद्ध केलेली एताम्‌ - ही पाण्डुपुत्राणाम्‌ - पांडूच्या पुत्रांची महतीम्‌ - विशाल चमूम्‌ - सेना पश्य - पाहा अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने-द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने-व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पाहा ॥३॥ भावार्थः मागील श्लोक पुढील श्लोक

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-२॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः संजय उवाच ।  दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।  आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥२॥ सञ्जय - संजय  उवाच - म्हणाले  तदा - त्यावेळी  व्यूढम्‌ - व्यूहरचनेने युक्त  पाण्डवानीकम्‌ - पांडवांचे सैन्य  दृष्ट्वा - पाहून  तु - आणि  आचार्यम्‌ - द्रोणाचार्यांच्या  उपसङ्गम्य - जवळ जाऊन  वचनम्‌ - असे वचन  अब्रवीत - बोलला संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला ॥२॥ भावार्थः मागील श्लोक पुढील श्लोक

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-१॥

श्रीमद्भगवद्गीता - 'गीतोपनिषद' म्हणूनही ओळखली जाते. गीतेमध्ये एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. कुरुक्षेत्रावर युद्धाच्या सुरुवातीला श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे. महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुन जेव्हा युद्ध करण्यास नकार देतो, त्यावेळी विविध उदाहरणे आणि उपमांच्या आधारे श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म आणि धर्म, योग आणि वेदान्ताबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. गीता सांगताना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखवुन, त्याला ते देव असल्याचे पटवुन दिले. अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः धृतराष्ट्र उवाच । धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।  मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥१॥ धृतराष्ट्र - धृतराष्ट्र राजा उवाच - म्हणाले सञ्जय - हे संजया धर्मक्षेत्रे - धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रे - कुरुक्षेत्रावर समवेताः - एकत्र जमलेल्या युयुत्सवः - युद्धाची इच्छा करणाऱ्या मामकाः - माझ्या मुला...

। श्री गणेश वंदन । Shree Ganesh Vandan ।

। श्री गणेश वंदन । ॥ ॐ गं गणपतये नमः ॥ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ Vakra-Tunndda Maha-Kaaya Suurya-Kotti Samaprabha । Nirvighnam Kuru Me Deva Sarva-Kaaryessu Sarvadaa ॥ ज्यांची सोंड वक्र आहे, ज्यांचे शरीर विशाल आहे आणि ज्यांचे तेज लाखो सूर्यासारखे आहे.  हे देवा, माझ्या सर्व कार्यात मला नेहमी तुझा आशीर्वाद दे आणि मला विघ्नांपासून मुक्त कर. जिनकी सूंड घुमावदार है, जिनका शरीर विशाल है और जिनका तेज करोड़ सूर्यों के समान है । हे देव, कृपया मेरे सभी कार्यों में सदैव अपना आशीर्वाद देकर मेरे कार्यों को बाधाओं से मुक्त करें ॥   Who has a curved trunk, who has a large body and shines as whose splendour is similar to Million Suns । O divine Lord, please bless my endeavours so they are obstacle-free, in everything I do, always ॥

श्री गणपति आरती | Shree Ganapati Aarati

सुखकर्ता दुखहर्ता सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मन कामनांपुरती ॥ रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मन कामनांपुरती ॥ लंबोदर पीतांबर फणीवर बंधना । सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकष्टी पावावें, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मन कामनांपुरती ॥ प्रार्थना घालीन लोटांगण, वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रुप तुझें । प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन । भावें ओवाळीन म्हणे नामा ॥१॥ त्वमेव माता च पिता त्वमेव। त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव । त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥ कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा,  बुद्धयात्मनावा प्रकृतिस्वभावात । करोमि यज्ञमं सकलंपरस्मे,  नारायणायसमर्पयामि ॥३॥ अच्युतं ...

पसायदान | Pasaydan

पसायदान आता विश्वात्मकें देवें | येणे वाग्यज्ञें तोषावें | तोषोनिं मज द्यावे | पसायदान हें || जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मीरती वाढो | भूतां परस्परे पडो | मैत्र जिवाचें || दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्यें पाहो | जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात || वर्षत सकळ मंगळी | ईश्वरनिष्ठांची मांदियाळी | अनवरत भूमंडळी | भेटतु भूतां || चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव | बोलते जे अर्णव | पीयूषाचे || चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन | ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु || किंबहुना सर्व सुखी | पुर्ण होऊनि तिन्हीं लोकी | भजिजो आदिपुरुखी | अखंडित || आणि ग्रंथोपजीविये | विशेषीं लोकीं इयें | दृष्टादृष्ट विजयें | होआवे जी || येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ | हा होईल दान पसावो | येणें वरें ज्ञानदेवो | सुखिया जाला || Open In App