श्रीमद्भगवद्गीता - 'गीतोपनिषद' म्हणूनही ओळखली जाते.
गीतेमध्ये एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.
कुरुक्षेत्रावर युद्धाच्या सुरुवातीला श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश
हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे.
महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुन जेव्हा युद्ध करण्यास नकार देतो,
त्यावेळी विविध उदाहरणे आणि उपमांच्या आधारे श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म
आणि धर्म, योग आणि वेदान्ताबद्दल मार्गदर्शन केलेले आहे.
गीता सांगताना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखवुन,
त्याला ते देव असल्याचे पटवुन दिले.
अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः
धृतराष्ट्र उवाच ।
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥१॥
- धृतराष्ट्र - धृतराष्ट्र राजा
- उवाच - म्हणाले
- सञ्जय - हे संजया
- धर्मक्षेत्रे - धर्मभूमी असलेल्या
- कुरुक्षेत्रे - कुरुक्षेत्रावर
- समवेताः - एकत्र जमलेल्या
- युयुत्सवः - युद्धाची इच्छा करणाऱ्या
- मामकाः - माझ्या मुलांनी
- च - आणि
- एव - तसेच
- पाण्डवाः - पांडूच्या मुलांनी, पांडवांनी
- किम् - काय
- अकुर्वत - केले
धृतराष्ट्र म्हणाले,
हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या
माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले?