सुखकर्ता दुखहर्ता
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामनांपुरती ॥
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामनांपुरती ॥
लंबोदर पीतांबर फणीवर बंधना ।
सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकष्टी पावावें, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामनांपुरती ॥
प्रार्थना
घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा,
बुद्धयात्मनावा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यज्ञमं सकलंपरस्मे,
नारायणायसमर्पयामि ॥३॥
अच्युतं केशवं रामनारायणं
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं,
जानकीनायकं रामचंद्र भजे ॥४॥
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।