श्रीमद्भगवद्गीता - ॥१-७॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥ हे ब्राह्मणश्रेष्ठ, कृपया आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत आपल्या माहितीसाठी मी आपल्याला सैन्याच्या सेनापती बद्दल सांगतो. भावार्थः मागील श्लोक पुढील श्लोक

पसायदान | Pasaydan

पसायदान


आता विश्वात्मकें देवें |
येणे वाग्यज्ञें तोषावें |
तोषोनिं मज द्यावे | पसायदान हें ||

जें खळांची व्यंकटी सांडो ।
तया सत्कर्मीरती वाढो |
भूतां परस्परे पडो | मैत्र जिवाचें ||

दुरितांचे तिमिर जावो |
विश्व स्वधर्म सूर्यें पाहो |
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ||

वर्षत सकळ मंगळी |
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी |
अनवरत भूमंडळी | भेटतु भूतां ||

चलां कल्पतरूंचे आरव ।
चेतना चिंतामणींचें गाव |
बोलते जे अर्णव | पीयूषाचे ||

चंद्रमे जे अलांछन |
मार्तंड जे तापहीन |
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ||

किंबहुना सर्व सुखी |
पुर्ण होऊनि तिन्हीं लोकी |
भजिजो आदिपुरुखी | अखंडित ||

आणि ग्रंथोपजीविये |
विशेषीं लोकीं इयें |
दृष्टादृष्ट विजयें | होआवे जी ||

येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ |
हा होईल दान पसावो |
येणें वरें ज्ञानदेवो | सुखिया जाला ||

Open In App


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रामरक्षा स्तोत्र

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-१॥

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-४, १-५, १-६॥