पोस्ट्स

अर्जुनविषादयोग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

श्रीमद्भगवद्गीता - ॥१-७॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥ हे ब्राह्मणश्रेष्ठ, कृपया आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत आपल्या माहितीसाठी मी आपल्याला सैन्याच्या सेनापती बद्दल सांगतो. भावार्थः मागील श्लोक पुढील श्लोक

श्रीमद्भगवद्गीता - ॥१-७॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥ हे ब्राह्मणश्रेष्ठ, कृपया आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत आपल्या माहितीसाठी मी आपल्याला सैन्याच्या सेनापती बद्दल सांगतो. भावार्थः मागील श्लोक पुढील श्लोक

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-४, १-५, १-६॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि । युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥४॥ धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् । पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः ॥५॥ युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् । सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥६॥ अत्र - येथे महेष्वासाः - मोठीमोठी धनुष्ये धारण केलेले च - आणि युधि - युद्धात भीमार्जुनसमाः - भीम व अर्जुन याप्रमाणे असणारे शूराः - शूर-वीर युयुधानः - सात्यकी विराटः - विराट महारथः - महारथी द्रुपदः - द्रुपद धृष्टकेतुः - धृष्टकेतू चेकितानः- चेकितान वीर्यवान्‌ - बलवान काशिराजः - काशिराज पुरुजित्‌ - पुरुजित कुन्तिभोजः - कुन्तिभोज नरपुङ्गवः - नरश्रेष्ठ शैब्यः - शैब्य विक्रान्तः - पराक्रमी युधामन्युः - युधामन्यू वीर्यवान्‌ - शक्तिमान उत्तमौजाः - उत्तमौजा सौभद्रः - सुभद्रेचा पुत्र द्रौपदेयाः - द्रौपदीचे पाच पुत्र सर्व एव - हे सर्वच महारथाः - महारथी   या सैन्यात मोठीमोठी धनुष्ये घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद ॥४॥ धृष्टकेतू, चेकितान, बलवान काशिराज, पुरुजित, कुंति...

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-३॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः संजय उवाच । पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् । व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥३॥ आचार्य - अहो आचार्य तव - तुमच्या धीमता - बुद्धिमान शिष्येण - शिष्याने द्रुपदपुत्रेण - द्रुपदपुत्र धष्टद्युम्नाने व्युढाम्‌ - व्युहरचना करून सिद्ध केलेली एताम्‌ - ही पाण्डुपुत्राणाम्‌ - पांडूच्या पुत्रांची महतीम्‌ - विशाल चमूम्‌ - सेना पश्य - पाहा अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने-द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने-व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पाहा ॥३॥ भावार्थः मागील श्लोक पुढील श्लोक

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-२॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः संजय उवाच ।  दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।  आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥२॥ सञ्जय - संजय  उवाच - म्हणाले  तदा - त्यावेळी  व्यूढम्‌ - व्यूहरचनेने युक्त  पाण्डवानीकम्‌ - पांडवांचे सैन्य  दृष्ट्वा - पाहून  तु - आणि  आचार्यम्‌ - द्रोणाचार्यांच्या  उपसङ्गम्य - जवळ जाऊन  वचनम्‌ - असे वचन  अब्रवीत - बोलला संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला ॥२॥ भावार्थः मागील श्लोक पुढील श्लोक

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-१॥

श्रीमद्भगवद्गीता - 'गीतोपनिषद' म्हणूनही ओळखली जाते. गीतेमध्ये एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. कुरुक्षेत्रावर युद्धाच्या सुरुवातीला श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे. महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुन जेव्हा युद्ध करण्यास नकार देतो, त्यावेळी विविध उदाहरणे आणि उपमांच्या आधारे श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म आणि धर्म, योग आणि वेदान्ताबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. गीता सांगताना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखवुन, त्याला ते देव असल्याचे पटवुन दिले. अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः धृतराष्ट्र उवाच । धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।  मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥१॥ धृतराष्ट्र - धृतराष्ट्र राजा उवाच - म्हणाले सञ्जय - हे संजया धर्मक्षेत्रे - धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रे - कुरुक्षेत्रावर समवेताः - एकत्र जमलेल्या युयुत्सवः - युद्धाची इच्छा करणाऱ्या मामकाः - माझ्या मुला...